Monday, April 1, 2013

Marathi Poem-प्रित

तो चंद्र कोणता होता 
ती रात्र कोणती होती 
शब्दांच्या गर्दीमध्ये 
हळुवार बहरली प्रीती 

टिपूर ते चांदणे 
रूप तुझे देखणे 
गालात आणिक हासणे 
डोळ्यानि डोळ्यांना पाहणे 

निर्मळ वाहता झरा 
मंद गार वारा
चंद्राचा खडा पहारा 
साराच खेळ न्यारा 

पाण्यात पाय होते 
हातात हात होते 
भावना गुंफीत जाता 
प्रेमाचे जुळले नाते !!!!
 

Marathi Poem - क्रेडीट कार्ड

मोठ मोठ्या ब्रण्डचे पहा किती सोंग
क्वालीटीच्या नावाखाली किंमत करते ढोंग 
पैसे द्यायलाही येथे लावावी लागते रांग 
गरजेच्या सोबत अनावष्यकहि घेऊन चला संग 

चमचमत्या रोशनित, थंडगार एसीत, टापटीप मांडणीत 
मनाला पडते भुरळ,
खिसा रिकामा असला तरीही 
क्रेडीट कार्ड निघते सरळ 

कार्डवर खरेदीची मग सवयच जडते 
आणि त्याचे बिल वाढतच जाते 
due date येताच बिल चुकविताना मात्र 
मग नाकी नउ येते.   

पंछी की उड़ान

 पंछी की उड़ान एक नन्हा तालाब का पंछी सुनता गरूड़ो की कहानियाँ,  उसे बहुत पसंद आती  पहाड़ों की ऊंचाइयाँ। फिर उसने देखा एक ख्वाब और दिल में इ...