Monday, January 4, 2016

कवीमन

कवी पैशासाठी कविता करीत नाही
आन केलि तरी त्याने पोट भरत नाही
पोट भरत नाही म्हणून
लिहियचा काही थांबत नाही
कितीही विरझन पडल तरी
त्याच काव्य काही नासत नाही
झाडाखाली,झाडावर
डोंगराखाली, डोंगरावर
फुलांवर,पानांवर
भुंग्यांच्याही गुणांवर
डोळे मिटुन,उघड्या डोळ्यांनी
एकट्यात, समुहात
हसत, रडत
प्रेमाने,चिडत
लिहितो बीचारा वारेमाप
आस प्रत्येकाला जमल् पाहिजे
जीवनाच् गान कागदावर नाहि तर नाही
पण मनात तरी गाता आल पाहिजे

**माती पावसाआधी आणि नंतर**

**माती पावसाआधी आणि नंतर** पावसाआधी माती कोरडी.   वास नाही.   फक्त धूळ.   पाय ठेवता धूळ उडते.   जसं कधी आयुष्य कोरडं राहतं.   उत्तर नाही.   ...