अवघा देह विठ्ठलमय व्हावा
आता न उरावा दुजाभाव
मुखे हरीनाम सदा नको अन्य काही
श्रीहरी इतुकेच द्यावे मज आता
तूच भगवंता सभोवती व्यापिलासे
मग मजला का न दिसे अतरंगी
सगुण तुज पाहण्या न्यावे पंढरीशी
निर्गुणत्व प्रकाषावे माझ्या अंतरी
माउली माझी आहे आळन्दिसी
तिजला काळजी माजी आसे
हरिनामाची गोडी लाविली तिने
हरिपाठ थोर मिटविला घोर