बहरलेल्या मोसमामध्ये
पान पान शांत आहे
पण मन माझे अशांत आहे
निःशब्द स्वर माझा
पावसातून ओघळत आहे
थेंब तुटती
टप टप आवाज होई
विसरून भान सारे
मन हे गीत गाई
भार रिकामा आपला
मेघ काळा करीतसे
अतृप्त धरेच्या झोळीत
खजिना ओतीतसे
सुवास दरवळे चहूदिशा
पल्लवित झाल्या आशा
मनोमनी पिके हशा
प्रेमाची बहरे भाषा