माझा वेगळा त्याचा वेगळा
प्रत्येकाचा आगळा वेगळा
प्रत्येकाचा आगळा वेगळा
कुणि बोलका कुणि चिड़का
कुणि रडका तर कुणि दोडका
कुणि रडका तर कुणि दोडका
स्वभावाला औषध नाहि
आज पेड़ा उद्या मिर्ची तर पर्वा सोडा
असा समजतो इतराना थोड़ा थोड़ा
आज पेड़ा उद्या मिर्ची तर पर्वा सोडा
असा समजतो इतराना थोड़ा थोड़ा
कधि गुणि कधि चावट कधि वात्रट तर
कधि बावळटही आसतो वेड़ा
कधि बावळटही आसतो वेड़ा
कधि शुर कधि भीत्रा कधि गंभीर कधि अल्लड तर कधि भोळाच आसतो बापुडा
शेवटी ज्याचा त्याचा स्वभाव ज्या त्या वेळी ज्याला त्याला जसा हवा तस्साच भासतो