मराठी कविता:- बेरोजगारी
किती जागा भरल्यात तुम्ही गेल्या कित्येक वर्षात?
किती संसार सुखावलेत तुम्ही गेल्या कित्येक वर्षात ?
किती बेरोजगारांच्या फ्याक्ट-या काढल्यात तुम्ही गेल्या कित्येक वर्षात?
किती भेदाच्या रेषा मिटवल्यात तुमी गेल्या कित्येक वर्षात ?
पण तुम्हाला चांगल ठाऊक आहे
गरिबी संपवायची नाही
कारण लोक सुखी झाल्यावर
काही तरी घेऊन मत कोण देणार ?
समतेच्या नावाखाली
निवडणुकीपूर्वी गाजरे वाटायची जोमात
नवीन रेषा भेदाच्या मारायच्या जनात
कधी पुतळा कधी आरक्षण तर कधी महागाई
कारण लोकांची मने दुखावली पाहिजेत
आणि त्यांच्यात भांडणे झालीच पाहिजेत
साहेब तुमी कामे केली आसतीत तर
अशी वेळ आलीच नसती
सर्व सुखी आसते तर एवढी मोठी गोळी लागलीच नसती
पण अजूनही वेळ गेली नाही
जरा बघा डोळे उघडून
समाज काय म्हणतोय
उर बडवून
त्याला टक्के नकोत
त्याला सुख हवंय
त्ये तुमच्या कागदावरच्या टक्क्यांनी
मिळेल का मग ?