पाकळीने गळण्याआधी फुलाला सांगितलेच नाही
फुलाने त्याचे मरण आपल्या डोळ्यांनी पाहिलेच नाही
झाड तर रोज नवीन फुले फुलवतच आहे
रक्षणासाठी त्यांच्या सोबत काटेही देत आहे
म्हणून गुलाबाचे फुल नाजूक तोडावे लागते
पाकळ्यांना आणि देठाला हळुवार जपावे लागते
तसच माणसाच मन घाबरत परमरण पाहून
आणि अंत्यसंस्काराला त्यांच्या स्मशानात जाऊन
हाव, भीती, चिंता बाटलीत बंद करून झाकण
मग ह्या मनाला गुलाबाच्या फुलासारख
जपायला नको का आपण?