प्रिय कांदा
नको मला कढीपत्ता ,नको मला कोथिंबीर
मला तर पोह्यात कांदाच हवा.
धपाट्यातही कांदा भाजीतही कांदा
मला उत्तप्प्यावरही कांदाच हवा.
अचानक येतो पावसाचा वास
आणि काहीतरी खायची इच्छा होते,
पावसाच्या गार लहरीत सुद्धा
गरम कांदा भजी ची आठवण येते.
काय ती कांद्याची प्रसिद्धी
दर एक पदार्थ कांदाच मागतो,
पण बाजारात सुद्धा गाजला हा
आता कांदा शाम्पूतही येतो.
नको तो कांदा चिरायचा त्रास
कांदा चिरताना खूप दुःख होतं,
पण स्वयंपाकाच्या चवीसाठी
मन तर कांदा टाकच म्हणत.
घरात तर सगळेच असतं
गाजर बटाटा मिरची व संत्री,
पण कांदाच त्यात मुख्य आहे
अशी आपली आणि कांद्याची मैत्री.
Siddhi Patil
Dedicated to all 'कांदा' lovers.