Wednesday, December 2, 2015

Marathi: Charolya


तू जात होतिस

पाऊस पडत होता
रस्ता माझ्या पायात
अडत होता
गालावरचि वाट
निसरडी झाली होती
डोळ्यापासून  पायापर्यन्त
ती ओली होती

Marathi poem: Ghalmel

रात्र ही काळोखी
स्वप्नात काजवे
डोळे झाकलेले
स्मृतित आठवे

आस तुजी मनी
जिव गुंतलेला
घट्ट धरुनी इच्छाना
शांत मि निजलेला

उषेचा दुरावा
सरता सरेना
अंधाराचा  पगडा
हटता हटेना

उद्या उगवेल  सूर्य
धरा प्रकाशेल
ही जगाचीच रीत
तरी उरी घालमेल

Monday, May 4, 2015

दशक

दशक :

 

डोळ्यांत तुझ्या विश्व मी पहिले 

भारावून मनी गीत हे गायिले 

लेख तुझ्या भाळीचे मी अनुभवले 

शब्द तुझ्या ओठीचे मी मूक ऐकिले 

 

प्रवास  होता खडतर पण चालताना 

दोघानाही नाही कळले अंतर 

क्षण सारे ते सुखदु:खाचे 

आपण एकत्र गुंफिले 

दारी आपुल्या समाधानाचे फुल उमलले 

 आणि पाहता पाहता आपल्या एकत्रित आयुष्याचे 

दशक संपले !!!!

 


Monday, January 12, 2015

अवघा देह विठ्ठलमय व्हावा

 
अवघा देह विठ्ठलमय व्हावा
आता न उरावा दुजाभाव
मुखे हरीनाम सदा नको अन्य काही
श्रीहरी इतुकेच द्यावे मज आता

तूच भगवंता  सभोवती व्यापिलासे
मग मजला का न दिसे अतरंगी
सगुण तुज पाहण्या न्यावे पंढरीशी
निर्गुणत्व प्रकाषावे माझ्या अंतरी

माउली माझी आहे आळन्दिसी
तिजला काळजी माजी आसे
हरिनामाची गोडी लाविली तिने
हरिपाठ थोर मिटविला घोर




पंछी की उड़ान

 पंछी की उड़ान एक नन्हा तालाब का पंछी सुनता गरूड़ो की कहानियाँ,  उसे बहुत पसंद आती  पहाड़ों की ऊंचाइयाँ। फिर उसने देखा एक ख्वाब और दिल में इ...