रात्र ही काळोखी
स्वप्नात काजवे
डोळे झाकलेले
स्मृतित आठवे
आस तुजी मनी
जिव गुंतलेला
घट्ट धरुनी इच्छाना
शांत मि निजलेला
उषेचा दुरावा
सरता सरेना
अंधाराचा पगडा
हटता हटेना
उद्या उगवेल सूर्य
धरा प्रकाशेल
ही जगाचीच रीत
तरी उरी घालमेल