कवी पैशासाठी कविता करीत नाही
आन केलि तरी त्याने पोट भरत नाही
पोट भरत नाही म्हणून
लिहियचा काही थांबत नाही
कितीही विरझन पडल तरी
त्याच काव्य काही नासत नाही
झाडाखाली,झाडावर
डोंगराखाली, डोंगरावर
फुलांवर,पानांवर
भुंग्यांच्याही गुणांवर
डोळे मिटुन,उघड्या डोळ्यांनी
एकट्यात, समुहात
हसत, रडत
प्रेमाने,चिडत
लिहितो बीचारा वारेमाप
आस प्रत्येकाला जमल् पाहिजे
जीवनाच् गान कागदावर नाहि तर नाही
पण मनात तरी गाता आल पाहिजे