उठतो तो लिहितो ऐकायला कान नाही
रचनेला मान नाहि
रसिकानच्या नजरेत कवितेला भाव नाही
यमकात त्राण नाहि लिखाणात प्राण नाहि
मारुन मुटकुन जमविलेल्या कवितेला
साहीत्याचि आण नाहि
रसिकानच्या नजरेत कवितेला भाव नाही
उच्चारात आव नाही मांडायला ठाव नाहि
मनावर घाव नाही
रसिकानच्या नजरेत कवितेला भाव नाही
शब्दामध्ये धार नाही वर्मावर वार नाही
निर्लज्ज ओळीणा कसलच भय नाहि
रसिकानच्या नजरेत कवितेला भाव नाही