Saturday, July 13, 2013

Marathi Poem- महागाई

पुस्तके महाग
वह्या महाग
फीस महाग
शाळेच्या दारी
शिक्षण महाग

रिक्षा महाग
ट्याक्सी महाग
बस महाग
टोलच्या साक्षीने
प्रवास महाग

भाज्या महाग
दाळी महाग
मसाले महाग
भुकेल्या पोटाला
जेवण महाग

हॉटेल महाग
सिनेमा महाग
पर्यटन महाग
थकलेल्या मनाला
मनोरंजन महाग

मत महाग
सत्ता महाग
कार्यकर्ते महाग
निवडून येण्यासाठी
खर्च महाग

खात महाग
बी महाग
नांगरणी महाग
खुरपणी महाग
कर्जबाजारी बळीराजाला
खळ महाग

औषधे महाग
इन्जेक्शन महाग
सलाईन महाग
मरणाच्या दारीहि
जगणे महाग



स्वतःशी झालेली भेट

  स्वतःशी झालेली भेट सगळ्यांसाठी धावताना, कधी स्वतःसाठी थांबलोच नाही, कुणाचं मन जपता जपता, आपलंच मन कधी जपलं नाही. एक दिवस असाच शांत बसलो, क...