|| सुप्रभात ||
आज शुक्रवार, नोव्हेंबर ४, २०२२ युगाब्द : ५१२४
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक कार्तिक १२, शके १९४४
आजचे पंचांग
सूर्योदय : ०६:४० सूर्यास्त : १८:०४
चंद्रोदय : १५:३३ चंद्रास्त : ०३:४१, नोव्हेंबर ०५
शक सम्वत : १९४४ शुभकृत्
ऋतू : शरद्
चंद्र माह : कार्तिक
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथि : प्रबोधिनी एकादशी - १८:०८ पर्यंत
नक्षत्र : पूर्वाभाद्रपदा - ००:१२, नोव्हेंबर ०५ पर्यंत
योग : व्याघात - ०३:१६, नोव्हेंबर ०५ पर्यंत
करण : वणिज - ०६:४६ पर्यंत
द्वितीय करण : विष्टि - १८:०८ पर्यंत
क्षय करण : बव - ०५:३४, नोव्हेंबर ०५ पर्यंत
सूर्य राशि : तूळ
चंद्र राशि : कुंभ - १८:१९ पर्यंत
राहुकाल : १०:५६ ते १२:२२
गुलिक काल : ०८:०६ ते ०९:३१
यमगण्ड : १५:१३ ते १६:३८
अभिजितमुहूर्त : ११:५९ ते १२:४५
दुर्मुहूर्त : ०८:५७ ते ०९:४२
दुर्मुहूर्त : १२:४५ ते १३:३०
अमृत काल : १६:२४ ते १७:५८
वर्ज्य : ०७:०३ ते ०८:३६
चातुर्मास समाप्ती
आजच्या कार्तिकी एकादशीचे महत्त्व म्हणजे या दिवशी श्रीविष्णूला बेल वाहिला, तरी चालतो आणि शिवाला तुळस वाहता येते.
तुळशीचे लग्न - प्रबोधिनी एकादशीला देव प्रबोधिनी असेही म्हणतात, हिंदीत देवउठनी एकादशी किंवा देवोत्थनी एकादशी.
कार्तिक शुद्ध एकादशीला प्रबोधिनी एकादशी असेही म्हणतात. देवशयनी आषाढ एकादशीला निद्रिस्त झालेले भगवान विष्णू प्रबोधिनी एकादशीला जागे होतात अशी कल्पना यामागे आहे.
कार्तिक शुद्ध एकादशीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंतच्या काळात कोणत्याही एखाद्या दिवशी घरच्या घरी तुळशीचे लग्न करण्याची प्रथा आहे. तुलसी विवाहात तुळशीचा विवाह कृष्णाशी (विष्णूशी) लावतात.