Saturday, August 4, 2018

जगन्याच्या मार्गावरती ( Marathi Poem)

जगन्याच्या मार्गावरती 

दिशाहीन चालताना 
वळणे  पुष्कळ आहेत 
जगन्याच्या मार्गावरती 
काटे पुष्कल आहेत 

जगन्याच्या मार्गावरती 
अनवाणी पायाखाली 
दगड पुष्कळ आहेत 
आणि पडताना 
हसणारे पुष्कळ आहेत 

जगन्याच्या मार्गावरती 
चुकल्यावर बोलणारे पुष्कळ  आहेत 
रडताना मात्र सोबत 
अश्रु दुर्मिळ आहेत 


स्वतःशी झालेली भेट

  स्वतःशी झालेली भेट सगळ्यांसाठी धावताना, कधी स्वतःसाठी थांबलोच नाही, कुणाचं मन जपता जपता, आपलंच मन कधी जपलं नाही. एक दिवस असाच शांत बसलो, क...