Friday, August 15, 2014

marathi poem:- साहेब

साहेब 

साहेब तुमचा तो हसमुख चेहरा 

डोळ्यांच्या त्या भेदक नजरा 

आजही काळजात घर करून आहेत 

तुमच्यासाठी शब्द माझे आजही आर्त आहेत 


बोलण्याने कधी कुणी तुमच्या दुखावला नाही 

दाराशी कधी कुणी हिरमुसला नाही 

तुमची भाषाच अशी

 दुधात साखर जशी 


तुमचे नेतृत्व , तुमचा विश्वास 

तुमचा उत्साह , तुमची उदारता 

सार कस नावाजण्याजोग 

म्हणूनच तर गाव माझ आज पुढारलेल 


कस सांगू तुम्ही गेलात तेव्हा काय वाटलं 

विकासाच तळ एकाएक आटल 

एकवटून आभाळ सार 

मनामध्ये दाटल 







Saturday, August 2, 2014

हिंदी कविता : भारत

भारत 

एक विचार हैं भारत 

एक संस्कृती हैं भारत । 

एक भाषा हैं भारत 

विविधता मैं एकता का
नारा हैं भारत। 


भौगोलिक सीमाओ में रेखित
देश हैं भारत । 


जन जन के मन का
वेष हैं भारत । 


हजारो सालो से चल रही
कहानी हैं भारत।  


करोडो जीवो की
जननी हैं भारत । 


सर्वोत्तम लोकतंत्र की जग मैं
पहचान हैं भारत । 


सुवर्णलिखित इतिहास की
शान हैं भारत । 


गुरु और ज्ञान का
पूजन हैं भारत । 


अध्यात्म और विग्यान का
मिलन हैं भारत । 

भारत माता की जय ।








Marathi Poem-कडा


Thursday, June 26, 2014

मराठी कविता:- बेरोजगारी

मराठी कविता:- बेरोजगारी 

किती जागा भरल्यात तुम्ही गेल्या कित्येक वर्षात?
किती संसार सुखावलेत तुम्ही गेल्या कित्येक वर्षात ?
किती बेरोजगारांच्या फ्याक्ट-या काढल्यात तुम्ही गेल्या कित्येक वर्षात?
किती भेदाच्या रेषा मिटवल्यात  तुमी गेल्या कित्येक वर्षात ?

पण तुम्हाला चांगल  ठाऊक आहे
गरिबी संपवायची नाही
कारण लोक सुखी झाल्यावर
काही तरी घेऊन मत कोण देणार ?

समतेच्या नावाखाली
निवडणुकीपूर्वी गाजरे वाटायची जोमात
नवीन रेषा भेदाच्या मारायच्या जनात
कधी पुतळा कधी आरक्षण तर कधी महागाई 
कारण लोकांची मने दुखावली पाहिजेत
आणि त्यांच्यात भांडणे झालीच पाहिजेत

साहेब तुमी कामे केली आसतीत तर
अशी वेळ आलीच नसती
सर्व सुखी आसते तर एवढी मोठी गोळी लागलीच नसती

पण अजूनही वेळ गेली नाही
जरा बघा डोळे उघडून
समाज काय म्हणतोय
उर बडवून

त्याला टक्के नकोत
त्याला सुख हवंय
त्ये तुमच्या कागदावरच्या टक्क्यांनी
मिळेल का मग ?

Tuesday, June 24, 2014

मराठी कविता :- गुलाब


पाकळीने गळण्याआधी फुलाला सांगितलेच नाही
फुलाने त्याचे मरण आपल्या डोळ्यांनी पाहिलेच नाही
झाड तर रोज नवीन फुले फुलवतच आहे
रक्षणासाठी त्यांच्या सोबत काटेही देत आहे

म्हणून गुलाबाचे फुल नाजूक तोडावे लागते
पाकळ्यांना आणि देठाला हळुवार जपावे लागते
 तसच माणसाच मन घाबरत परमरण पाहून
आणि अंत्यसंस्काराला त्यांच्या स्मशानात जाऊन

हाव, भीती, चिंता बाटलीत बंद करून झाकण
मग ह्या मनाला गुलाबाच्या फुलासारख
जपायला नको का आपण?



 

Monday, April 7, 2014

मराठी कविता: जायचे असेल तर

जायचे असेल तर खुशाल जा
मागे वळुनही पाहु नको
आणि तुला थांबवण्याची वेडी आस
भाभड़या मनाला लावू नको

ओठांच्या पाकळ्या तुझ्या 
थोड्याही उमलु नको
आणि हृदयातील बांध माझ्या
उगाचच फोडू नको 

डोळ्यातील आश्रु तुझ्या 
पापण्याड़ लपवून ठेव
आणि सोबतीचे क्षण सारे
अंधारात दडवून ठेव









Thursday, November 7, 2013

Marathi Poem-आनंदाच तोरण

प्रिये  रुसण  तुझ
मला अनुभवायचय
भेटवस्तूशिवाय
तुला समजवायचय

आतुर होऊन
येताना धावत पाहायचय
विरहाच डोळ्यातील पाणी
हातांनी पुसायचय

राग तुझा  घालवून
आनंदाच तोरण
चेहऱ्यावर तुझ्या
बांधायचय  !!!!!





Saturday, July 27, 2013

Hindi Poem: उम्मीद

उम्मीद:

इस कदर इरादोने भरली हैं हिम्मत
वक्तकी  करवट बदलने लगी हैं 

मरने का इरादा ढलने लगा हैं
जीने की ख्वाइश उगने लगी हैं

आसमाँ में बादल छाने लगे हैं
कलियोंके फुल अब खिलने लगे हैं

उनकी खुशबू हवाओमे घुलने लगेगी
सासे भी रूककर महकने लगेंगी

आस हैं दिल में गरजकर बिजली चमकेगी
फिर खुशियोंकी जमकर बारिश भी होगी


उम्मीद की किरण रोशन हुई हैं
दुःख का अँधेरा मिटने लगेगा 

Saturday, July 13, 2013

Marathi Poem- महागाई

पुस्तके महाग
वह्या महाग
फीस महाग
शाळेच्या दारी
शिक्षण महाग

रिक्षा महाग
ट्याक्सी महाग
बस महाग
टोलच्या साक्षीने
प्रवास महाग

भाज्या महाग
दाळी महाग
मसाले महाग
भुकेल्या पोटाला
जेवण महाग

हॉटेल महाग
सिनेमा महाग
पर्यटन महाग
थकलेल्या मनाला
मनोरंजन महाग

मत महाग
सत्ता महाग
कार्यकर्ते महाग
निवडून येण्यासाठी
खर्च महाग

खात महाग
बी महाग
नांगरणी महाग
खुरपणी महाग
कर्जबाजारी बळीराजाला
खळ महाग

औषधे महाग
इन्जेक्शन महाग
सलाईन महाग
मरणाच्या दारीहि
जगणे महाग



Monday, April 1, 2013

Marathi Poem-प्रित

तो चंद्र कोणता होता 
ती रात्र कोणती होती 
शब्दांच्या गर्दीमध्ये 
हळुवार बहरली प्रीती 

टिपूर ते चांदणे 
रूप तुझे देखणे 
गालात आणिक हासणे 
डोळ्यानि डोळ्यांना पाहणे 

निर्मळ वाहता झरा 
मंद गार वारा
चंद्राचा खडा पहारा 
साराच खेळ न्यारा 

पाण्यात पाय होते 
हातात हात होते 
भावना गुंफीत जाता 
प्रेमाचे जुळले नाते !!!!
 

Marathi Poem - क्रेडीट कार्ड

मोठ मोठ्या ब्रण्डचे पहा किती सोंग
क्वालीटीच्या नावाखाली किंमत करते ढोंग 
पैसे द्यायलाही येथे लावावी लागते रांग 
गरजेच्या सोबत अनावष्यकहि घेऊन चला संग 

चमचमत्या रोशनित, थंडगार एसीत, टापटीप मांडणीत 
मनाला पडते भुरळ,
खिसा रिकामा असला तरीही 
क्रेडीट कार्ड निघते सरळ 

कार्डवर खरेदीची मग सवयच जडते 
आणि त्याचे बिल वाढतच जाते 
due date येताच बिल चुकविताना मात्र 
मग नाकी नउ येते.   

Sunday, March 24, 2013

Marathi Poem-दुष्काळ

ब्लड डोनेशन पेक्षाही आता
वाटर डोनेशन महत्वाचे आहे
सध्याचा दुष्काळच तसा महाभयंकर आहे

पाण्याविन  पाखरे जनावरेही मरत आहेत
हृदयद्रावक त्यांचे सापळे सगळीकडे दिसत आहेत
झाडे वाळताहेत, पाय पोळताहेत
माणसांची मन जळताहेत

आभाळाकडे डोळे लावायला पावसाळा खूप लांब आहे
राज्यभर ह्या होळीत पाण्याचीच बोंब आहे

मित्रानो ह्यावर्षी जमलच तर खा पुरणाची पोळी
बोम्बलुन सोडा बंदुकीची गोळी
पण पाण्याची मात्र  साजरी करू नका होळी

कारण
ब्लड डोनेशन पेक्षाही आता
वाटर डोनेशन महत्वाचे आहे
सध्याचा दुष्काळच तसा महाभयंकर आहे.

Thursday, March 21, 2013

रचन्या कठीण
असतसे जरी
सुरस ते परी
सुधाकरी 

Tuesday, March 19, 2013

Marathi Poem-विरह

विरह :-
तुझ्याविन दिन
भेटण्याचा ध्यास
प्राणाविन श्वास
सर्वस्व तु

तुझीग सावली 
परतुनी गेली 
आगहि लागली 
धग आता

(काव्य प्रकार - सुधाकरी )

Animation-Dog run

If it does not run here then please click on the image. After clicking it will run in the same window.
Also you can view by this link.


Saturday, March 16, 2013

Marathi Poem-वादळ


एक प्रश्न चमकला मनात
"का शांतता वादळापूर्वी  ?"
मते विज्ञानाच्या असते ती पोकळी
दश दिशांनी दाब आकर्षणारी
पण काही केल्या न भरणारी

पुन्हा प्रश्न " मग हि पोकळी का?"
वातावरण तापणे  कारण निर्माणाला
नंतर सुरु होतो विध्वंस
हाच नियम आयुष्याला

निसर्गाचे असू द्या
तिथे चंद्र, सूर्याची मर्जी
पण आपल्या जीवनात मात्र
वातावरण तापायला "मेरी मर्जी"

Thursday, March 14, 2013

Marathi Poem-झुंज

A poem झुंज for my friend Parag.

हे प्रतल आकांक्षाचे
भूजानि वेढील क्षितिजाला
तमा न बाळगेल परिणामांची
ध्येयाकडे मार्ग क्रमताना

जल कुठले बांधील आता
शिकलो मी सागर तरायला
भरधाव वेगाचे अश्व रथाचे
खेचून आणीन विजयश्री मजला 

Monday, March 11, 2013

Hindi Poem- कंप्यूटर पार्ट्स


Educational poem for computer parts:

एक बार सारे कंप्यूटर पार्ट्स की हुई मीटिंग

माऊस घूम घूमके बोला, सबसे अच्छा मैं
क्यों की लोगो को पुरे कंप्यूटर की सैर करता मैं

कीबोर्ड बोला मैं तो दोनो हाथ लपेटता हु
टाइप किया सब स्क्रीन पे छापता हूँ

माइक्रोफोन बोला मैं सबकी आवाज लेता हु
स्पीकर बोला मैं उसको कानोंतक पहुँचाता हूँ

डिस्प्ले कैसे चुप रहता,बोला मैं तो सब दिखाता हूँ
हार्ड डिस्क बोली मैं सब डाटा जमाती हूँ

ड्राइव एकसाथ बोले हम डाटा तुझतक लाते हैं
डाटा ट्रान्सफर मैं काम आते हैं

सॉफ्टवेर चिल्लाया चुप रहो सब तुम सारे शरीर के अंग हो
मैं तो तुम्हारी आत्मा हूँ , मुझबिन तुम सब डेड हो

ये सब सुनकर शांत सीपीयू हुआ उठ खड़ा
बोला ना तू बड़ा ना मैं बड़ा
मैं तुम सबको एक रखता हूँ
तुम सब हमेशा मेरी आज्ञा सुनते हो  जो मनुष्य मुजे देता हैं
हम सब किसी न किसी प्रकार उसके काम आते हैं ..




पंछी की उड़ान

 पंछी की उड़ान एक नन्हा तालाब का पंछी सुनता गरूड़ो की कहानियाँ,  उसे बहुत पसंद आती  पहाड़ों की ऊंचाइयाँ। फिर उसने देखा एक ख्वाब और दिल में इ...