एक प्रश्न चमकला मनात
"का शांतता वादळापूर्वी ?"
मते विज्ञानाच्या असते ती पोकळी
दश दिशांनी दाब आकर्षणारी
पण काही केल्या न भरणारी
पुन्हा प्रश्न " मग हि पोकळी का?"
वातावरण तापणे कारण निर्माणाला
नंतर सुरु होतो विध्वंस
हाच नियम आयुष्याला
निसर्गाचे असू द्या
तिथे चंद्र, सूर्याची मर्जी
पण आपल्या जीवनात मात्र
वातावरण तापायला "मेरी मर्जी"