पाखरे:-
इवली इवली पाखरे जमली
ज्ञानाचे दाने खाया
गुरुजनांनी मोठी केली
उंच आकाशात उडाया
पोटासाठी झटताना
उन्हा पावसात हिंडताना
दूर दूर उडाली अर्थार्जन कराया
तरी प्रीत उरात राखली
मित्रांना नाही विसरली
शाळेची माया नाही ओसरली
पण आज पाहा किती अगतिक झाले
आली घरट्यात परतुनी पाखरे
भिंतीना ह्या पुन्हा स्पर्श कराया
आठवनिनि डोळे भराया
शाळेच्या कार्याचा इतिहास रचाया.